#भारतबंद: मनसेकडून नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराच्या परिसरातच निदर्शनं

नागपूर: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात सुरु असलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे उतरली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी नागपुरात माननीय मुख्यमंत्र्यांच्या घराच्या परिसरातच निदर्शनं केली.

भाजपाने विरोधकांच्या भारतबंद आंदोलनाबाबत आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. भाजपानेते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेऊन “इंधनाचे दर कमी करणे हे सरकारच्या हातात नसून, आंतरराष्ट्रीय स्थरावरील परिस्थितीला अनुरूप इंधनाचे दर कमी-अधिक होत असतात” असे वक्तव्य केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)