“भारत’च्या शूटिंगसाठी माल्टाला पोहचली कतरिना कैफ

युवराज, मैंने प्यार क्‍यूं किया, एक था टायगर आणि टायगर जिंदा है यासारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी सलमान खान याच्या होम प्रॉडक्‍शन निर्मित अली अब्बास जफर यांच्या “भारत’ चित्रपटात ही जोडी झळकणार आहे.

सलमान खान याने या महिन्याच्या सुरूवातीस माल्टा येथील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत “भारत’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता कतरिता कैफ देखील या चित्रपटाच्या शुटिंगसाठी माल्टाला रवाना झाली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर करत पुढील डेस्टिनेशन माल्टा आहे, असे सांगितले.
सलमान आणि कतरिना या जोडीचा हा सहावा चित्रपट असून अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनाखालील दुस-यांचा काम करत आहे.

यापूर्वी “टायगर जिंदा है’ यात त्यांनी काम केले होते. दरम्यार, “भारत’ चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार होती. मात्र, तिने अचानक माघार घेतल्याने ही भूमिका कतरिनाला देण्यात आली. यात सलमान आणि कतरिनाशिवाय दिशा पाटनी, तब्बू, नोरा फतेही आदी कलाकार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)