“भामा आसखेड’ भामात 3280 क्‍युसेकने विसर्ग

भामा आसखेड- भामा आसखेड परिसरात आज (मंगळवारी) पुन्हा पावसाने जोर धरल्याने भामा आसखेड धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणांमधून भामा नदीत 3280 क्‍युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच पश्‍चिम भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण रविवारी (दि. 19) सायंकाळी भरल्याने धरणातून 553 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले होते. तर सोमवारी (दि. 20) हाच विसर्ग 1653 क्‍यूसेक्‍स करण्यात आला होता. त्यातच आज सकाळपासून पाऊस बरसत असल्याने हा विसर्ग आता 3280 क्‍युसेक करण्यात आला. जर पाऊस असाच बरसत राहिल्यास प्रवाह आणखी वाढविण्यात येणार आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)