भामा-आसखेड प्रकल्पाचे काम लवकर सुरू – विजय शिवतारे

मुंबई – शहराची वाढती लोकसंख्या व शहराला लागणारे वाढीव पाणी याचा विचार करुन दौंड तालुक्‍यातील भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरु करण्याबाबत बैठक घेऊन काम मार्गी लावू, असे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिले.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यातील भामा आसखेड प्रकल्पातील पाण्यासंदर्भात सदस्य राहूल कुल यांनी विधान सभेत लक्षवेधी सूचना मांडली होती यावर उत्तर देताना शिवतारे म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या व शहराला लागणारे वाढीव पाणी याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. भामा आसखेड प्रकल्पाच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार भामा आसखेड प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र 23 हजार 110 हेक्‍टर आहे.

या प्रकल्पाच्या 188.611 दलघमी पाणी वापरापैकी 141.486 दलघमी पाणी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण व लगतच्या 19 गावांना पिण्याचे पाणी वापरासाठी शासनाकडून वेळोवेळी आरक्षित केले आहे. यासाठी पाईपलाईनची सुविधा केली असून याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 137 कोटींचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने शासनाला पाठवावा यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)