भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नक्‍की करणार – बापट

कालवा समिती बैठकीत चर्चा

पुणे- भामा-आसखेड धरणातून पुणे शहराला पाणी आणण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. या प्रश्‍नी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून त्यामधून मार्ग काढला जाणार आहे. शेतकऱ्यांचे पुर्नवसन नक्की करू, असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा झाली. भामा आसखेड प्रश्‍नी लवकरच पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, स्थानिक आमदार यांची बैठक लवकरच घेण्यात येईल. पुर्नवसना प्रश्‍न तोडासा क्‍लिष्ट झाला आहे. पण त्यामधून मार्ग काढण्यात येईल. सध्या नवनविन कायदे आले आहेत. त्यामधून शेतकऱ्यांचे योग्य असे पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सुरेश गोरे यांना प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करण्यास सांगितले. तर भामा आसखेडमध्ये एकूण 1,404 प्रकल्पग्रस्त आहेत. यातील 388 शेतकऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पात्र ठरविले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायलयात अपील दाखल करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मोबदला द्यायचा झाला तर किती रक्कम द्यावी लागेल, याविषयीचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)