भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर मुंबई येथे बैठक

पुणे – भामा-आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमिनीच्या बदल्यात जमीन मिळावी, अशी मागणी आहे. भामा-आसखेड धरणाचे लाभक्षेत्र समाप्त झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुर्नवसन करायचे असेल. तर शेतकऱ्यांना लाभक्षेत्राच्या बाहेर जमिनी द्याव्या लागणार आहेत. अथवा आजच्या रेडिरेकनरनुसार जमिनीचे मूल्यांकन करून रोख स्वरुपात मोबदला द्यावा लागणार आहे. या संदर्भात शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. यासाठी राज्याचे मदत व पुर्नवसन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लवकरच बैठक होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांची संख्या 1 हजार 313 आहे. यातील 388 प्रकल्पग्रस्तांना नव्याने नोटीस देऊन 65 टक्के रक्कम भरून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार तपासणीची कार्यवाही करून नोटीस देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. या 388 प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात द्यावी लागणारी जमीन अथवा रोख मोबदला यावर विचार सुरू आहे. भामा-आसखेड धरणाचे लाभक्षेत्र समाप्त झाले आहे. त्यामुळे यासर्वांचे पुर्नवसन करायचे असेल, तर शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असल्याचे राव यांनी सांगितले.

-Ads-

यासाठी मुंबई येथे लवकरच मदत व पुर्नवसन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून याविषयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होणार आहे. यावर होणारा निर्णय राज्यभर लागू होणार असल्याने या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)