भामा आसखेडच्या कामाला गती मिळणार?

सौरभ राव यांच्या आयुक्‍तपदी बदलीने आशा वाढली

पुणे – भामा आसखेड प्रकल्पाचे काम गेल्या महिन्याभरापासून बंद असून, प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन न झाल्यामुळे गावकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पुनर्वसनाची जबाबदारी होती. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्तांचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या कामाला गती दिल्यास भामा आसखेड योजना प्रकल्प मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.

पुणे शहराच्या दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड ही योजना आखण्यात आली होती. भामा-आसखेड धरणातून दोन टीएमसी पाणी ही योजना पूर्ण झाल्यास पुणे शहराला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणामध्ये भूसंपादन केल्या आहेत. त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी भामा आसखेड प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे. केवळ चर्चा होतात मात्र त्यातून मार्ग निघत नाही. काही दिवस काम सुरू होते, पुन्हा गावकरांनी विरोध केल्यानंतर काम बंद होते. त्यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याप्रकल्पाचे काम 2014 मध्ये सुरु करण्यात आले होते. 380 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आले आहे. सध्या 60 ते 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती झाल्यामुळे याकामाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. याठिकाणच्या नागरिकांचा पुर्नवसनाचा प्रश्न राव यांनी हाताळला आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)