भामा-आसखेडचा तिढा कायम

जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टाई निष्फळ

पुणे : शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेडून सुरू असलेल्या भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी धरणग्रस्तांनी हे काम बंद पाडल्यानंतर या प्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरूवारी बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या मान्य झाल्या शिवाय, काम सुरू करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. तसेच काम सुरू केल्यास सामुहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे काम रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकी तर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पाग्रस्तांनी हे कात अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन 1700 मिमी व्यासाच्या जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान आपल्या मागण्यांसाठी या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आता पुन्हा रविवारपासून प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली असून काम बंद राहिल्यास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करता येणार नाही.    त्यामुळे महापालिकेने पत्र पाठवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, मराठा आंदोलनामुळे बंदोबस्त देण्यास पोलिसांकडून असमर्थता दर्शविण्यात आली होती. त्यामुळे पालिकेने या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले होते.

ग्रामस्थांचा काम सुरू करून देण्यास नकार
दरम्यान, गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ग्रामस्थ, महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे तसेच योजनेचे काम रखडत असल्याने ते पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. महापालिकेने अथवा जिल्हाप्रशासनाकडून मागण्या बाबत निर्णय न घेता काम सुरू केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे कोणत्याही तोडया विना ही बैठक संपविण्यात आली, त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस काही दिवस काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी, नेमके किती दिवस काम थांबवायचे याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या योजनेचे काम अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)