भाबेन साकियाच्या जामिनावर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी

पुणे- गैरवर्तनाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची तंबी दिल्यामुळे हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या रसीला राजू यांचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षक भावेन भराली सैकिया (वय 27, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. तातीबहार, जि. लखीमपूर, आसाम) याच्या जामीन अर्जावर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. रोटे आदेश देणार आहेत.
तर रसिला राजू ओझम पोईम पुरायील उर्फ ओपी (वय 24 मूळ रा. ओझम पोईल, जि. कोझीकोड, केरळ) यांचा साकिया याने 29 जानेवारी 2017 रोजी खून केला होता. खून करून पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे मुंबईतून अटक केली होती. याप्रकरणी भाबेन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी ऍड. बी,ए.आलुर यांच्यामार्फत अर्ज केला होता. या अर्जाला युक्तीवाद करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे. बचाव पक्षातर्फे जामिन देण्याची मागणी ऍड. आलुर यांनी केली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून, 12 सप्टेंबर रोजी जामिनावर सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)