भानोबा विद्यालयाचे व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये यश

वरवंड – जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणेद्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा श्री भानोबा विद्यालय कुसेगाव (ता.दौंड) येथे पार पडल्या. श्री भानोबा विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या आणि 17वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुले आणि मुली या दोन्ही संघाची निवड झाली आहे. मुलांच्या संघातील पवन मेमाने, रोहित शेलार, सिध्दार्थ गोंडे, वैष्णव शितोळे, पुष्कर पटोना, अमरदीप चव्हाण आणि मुलींच्या संघातील शितल केकाण, माधुरी भागवत, ज्ञानेश्वरी लोखंडे, शिवानी भोसले, श्रेया फडतरे, आदिती कुल यांनी उत्कृष्ट खेळ केला. याच विद्यालयाच्या 14वर्षे वयोगटातील मुली, 17वर्षे वयोगटातील मुले, 19वर्षे वयोगटातील मुलींच्या संघानेही द्वितीय क्रमांक पटकावला आहे. खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नामदेव खडके यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष केशवराव शितोळे, सचिव कचरदास उदावंत, रंगनाथ शितोळे, मुख्याध्यापक विनायक सुंबे, पर्यवेक्षक शहाजी वाबळे व शिक्षकवृदांने अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)