भानगावच्या “त्या’ कुटुंबाविरोधात

पारधी समाजाची गृहखात्याकडे तक्रार

श्रीगोंदे – भानगाव येथील पारधी समाजाच्या कुटुंबीयांकडून “ऍट्रासिटी’चे खोटे गुन्हे दाखल करून ब्लॅकमेल करणे, मराठा समाजातील श्रीमंत लोकांकडून पैसे उकळणे असे प्रकार होतात. “त्या’ कुटुंबाचा पोलीस खात्याने कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पारधी समाजाच्या चौदा पुरुषांनी आणि सहा महिलांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पारधी समाजाच्या वीस लोकांनी हे निवेदन कर्जतचे पोलीस उपअधीक्षक, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्राचे गृहसचिव व प्रधान सचिवांनाही पाठविले आहे. आपल्या निवेदनात ते म्हणतात, की भानगावमधील ते आदिवासी कुटुंब आम्हा पारधी समाजाला असा दम देतात, की त्यांनी दाखल केलेल्या खोट्या “ऍट्रासिटी’च्या गुन्ह्यात त्यांना आम्ही साथ द्यावी. अन्यथा, आम्हाला जगणे मुश्‍कील करून टाकण्याची धमकी दिली आहे. आमच्यावर खोटे-नाटे 302 चे गुन्हे, आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. सवर्ण समाजाला “ब्लॅकमेल’ करण्याबरोबर आम्हालाही ते “ब्लॅकमेल’ करीत आहेत. या कुटुंबाने वेळोवेळी दाखल केलेले गुन्हे तपासले, तर ते केवळ “ब्लॅकमेल’साठीच होते, असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सुरुडीच्या माजी सरपंच सुमन चव्हाण, शैल्या चव्हाण, नवनाथ चव्हाण, जंबू चव्हाण, अलका चव्हाण, भगवान चव्हाण, शरद काळे, गुलाब काळे, प्रदीप काळे, रेखा काळे, निकिता काळे, नवनाथ भोसले, सुनंदा भोसले, सागर काळे, सचिन काळे, सखाराम चव्हाण, मनीषा चव्हाण, कृष्णा चव्हाण, ऐनास चव्हाण व रामदास चव्हाण या वीस जणांच्या सह्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)