भात लागवडीखालील क्षेत्र वाढणार

बाजारपेठेत बियाणांचा तुटवडा
नागठाणे, दि. 13 (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यातून भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून यावर्षी इतर भाताच्या वाणापेक्षा इंद्रायणी जातीच्या वाणाला शेतकरी पसंती देत आहेत. मात्र यावर्षी वाढणाऱ्या इंद्रायणी भाताच्या क्षेत्रामुळे बियाण्याचा तुटवडा बाजारपेठेत जाणवत आहे.
यंदा सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांच्यात पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. धूळवाफ पेरणी मृग नक्षत्रात व आधी आटोपली जाते. भात पेरणीसाठी संकरीत बियाणांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रांच्या समोर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. या वर्षी भात क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्याच्या पश्‍चिमभागाबरोबरच बागायत पट्ट्यातही मोठ्या प्रमाणात भात पीक घेतले जात आहे. भाताच्या इतर वाणांपेक्षा इंद्रायणीच्या रूचकर व स्वादी तांदळास मोठ्या प्रमाणात बाजारात मोठी मागणी असते. याचा विचार करून शेतकरी इंद्रायणी भात शेतीकडे वळत आहे. या वर्षी वाढणाऱ्या भात शेतीचा अंदाज कृषी केंद्र चालकांना न आल्याने यावर्षी इंद्रायणी भात बियाण्याचा तुटवडा जाणवत असून शेतकरी जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांत चौकशी करताना दिसत आहे. तर काही शेतकरी घरगुती बियाण्याची पेरणी करताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)