भाताचे उत्पादन 50 टक्‍क्‍यांनी घटले

खेडच्या पश्‍चिम भागात झोडणी अंतिम टप्प्यात : दाणे भरण्याच्या कालावधीतच पावसाची दडी

राजगुरूनगर- खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये भात झोडणी अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी ऐन भाताचे दाणे भरण्याच्या सुमारास पाऊस गेल्याने उत्पादनात 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट झाली आहे.
खेड तालुक्‍यात सर्वाधिक भाताचे पिक घेतले जाते. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात हे पीक मुख्य पिक आहे. या भागात सर्वाधिक पाऊस पडतो त्यामुळे भाताचे पीक चांगले येते पावसावर आधारित शेती असल्याने भाताच्या विविध जाती शेतकरी लावतात. यावर्षी सुरुवातील समाधान कारक पाऊस पडला त्यामुळे भाताची रोपे चांगली आली. जुलै महिन्यात भाताची लागवड (आवणी) करण्यात आली मात्र सप्टेंबर महिन्यात भातपिकात दाणे भरण्यापूर्वी पाऊसाने दांडी मारल्याने भाताचे दाणे भरले नाहीत. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात दरवर्षीपेक्षा 50 पेक्षा जास्त घट झाली आहे.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने खेड तालुक्‍यात भात शेती उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ भात पिकावर याभागातील शेतकरी अवलंबून असतो रब्बी हंगामात याभागात शेती पिकत नाही. पाणी योजना नसल्याने आणि पाण्याचे स्रोत नसल्याने या भागातील शेतकऱ्यावर नेहमीच संकटे आली आहेत. शेतकरी काबाड कष्ट करून भात शेती करतो शेवटी मात्र कोरडा, ओला दुष्काळ, करपा रोग आदि संकटे आल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होतो त्यामुळे त्याची प्रगती होत नाही.
यावर्षी पावसाने मोठी दडी दिल्याने भात पिकाचे उत्पादन घटल्याने हाताशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी भागातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून शासकीय मदत मिळण्याची मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

  • शेतकरी मेटाकुटीला
    इंद्रायणी, बासमती, कोलम, कोलंबा, जीरा, कमावत्या, खडक्‍या, आंबेमोहर, यासह आधुनिक भाताच्या वाणाची शेतकरी लावणी करतात मात्र दरवर्षी कोणत्या न कोणत्या नैसर्गिक संकटात भात शेती सापडत असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)