भाड्याच्या इमारतीत पोलीस आयुक्‍तालय

पिंपरी – शहराकरीता स्वतंत्र्य पोलीस अयुक्तालय सुरु करायचे अस्ल्यास 50 ते 100 एकर जागेची आवश्‍यकता लागते मात्र सध्या जागा उपलब्ध नसल्याने भाड्याच्या इमारतीत आयुक्तालय सुरु करावे लागेल. अशी माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट मंगळवारी दि 14 ला दिली.

ते शहरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की आयुक्तालय काय पोलीस ठाण्याप्रमाणे छोटी बाब नसुन त्यासाठी 50 ते 100 एकर जागा लागणार आहे सध्या जागेचा शोध घेतला जात आहे. व त्यासाठी लागणारा आवश्‍यक स्टाफची तर्तुत करावी लागणार आहे. त्या संदर्भात पोलीस आयुक्त , ग्रानीण अधिक्षक, वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्र्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तोपर्यंत तात्पुरते आयुक्ताल भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु केले जाईल असे ते म्हणाले. शहरातील 2 ते 3 जागांना तत्वत पंसती दिली गेली आहे. त्यापैकी एक योग्य जागा निवडण्या करीता पोलीस अयुक्त, ग्रामीण अधिक्षक, व आमदार यांची बैठक येत्या अठवड्याभरात आयोजीत केली आहे.

त्यात जागेचा निर्णय गेतला जाईल. आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण क्षेत्रातील 9 व शहरी क्षेत्रातेल 5 पोलीस ठाण्याचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्वाचे एकसुत्रीकरणास थोडा वेळ लागणार आहे. पिंपरी- चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठीकाणी सर्वांना सोईस्कर ठरेल अशाच ठीकाणी आयुक्तालय सुरु करण्याचा विचार आहे. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन आयुक्तालयाचे उद्घाटन करण्याचे सत्ताधारी भाजपचे धोरण आहे का? असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले असले भाजप कुठलेही काम निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करत नाही शहराला आयुक्तालयाची गरज होती म्हणुनच राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली. सर्व कार्यवाही पुर्ण होताच लवकरात लवकर अयुक्ताल सुरु करण्याचा विचार असल्याचे यावेळी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)