भाडेकरू घरावर कब्जा करू शकतो का?

कायमस्वरूपी भाडेकरार म्हणजे कालावधी सुस्पष्ट नसलेले भाडेकरार तयार करता येऊ शकतात. “एक्‍स्प्रेस ग्रॅंट्‌स’ किंवा “प्रीज्यूम्ड/इम्प्लाइड ग्रॅंट्‌स’च्या माध्यमातून हे करार केले जाऊ शकतात. त्यामुळे भाडेकरार करताना त्याचा मसुदा काळजीपूर्वक तयार करणे अत्यावश्‍यक असते. अनुबंधित कालावधीनंतरही करार दृढ राहतील, अशा प्रकारे कराराचा मसुदा तयार केला पाहिजे. बेमुदत कालावधीसाठीच्या भाडेकराराला कायदेशीर मान्यता असते. “ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी अॅक्‍ट-1882′ मध्ये भाडेकरार या शब्दाची परिभाषा दिली आहे. त्यानुसार अचल संपत्तीच्या भाडेकरार म्हणजे, “एका विशिष्ट कालावधीसाठी, हेतूसाठी किंवा बेमुदत काळासाठी वापर करण्याचा अधिकार किंवा हस्तांतरण’ म्हणजे भाडेकरार होय.

सन 1903 मध्ये जिम्बलर विरुद्ध अब्राहम खटल्यात न्यायालयाने म्हटले होते की, ज्या भाडेकरारासाठी कोणताही कालावधी निश्‍चित केला गेला नसेल आणि भाडेकरू विशिष्ट भाडे नियमित स्वरूपात भरेल, भाडे वाढविले जाणार नाही, असे ज्या करारात निश्‍चित केलेले असते, असे करार भाडेकरू हयात असेपर्यंत वैध मानण्यात येतील. त्यामुळे घरमालकांना भाडेकरार करताना असा सल्ला दिला जातो की, भाडेकरार करताना भाडे वाढवून देण्याच्या कलमाचा त्यांनी प्रामुख्याने विचार करावा. वेळोवेळी भाडे वाढवून देण्याचे कलम भाडेकरारात जरूर समाविष्ट केले जावे. भाडेकराराचा अवधी निश्‍चित केला नसेल, तर भाडेकरूकडून घर खाली करून देण्याचे कलम करारात असणे पुरेसे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचप्रमाणे डिपॉझिटची रक्कम जप्त करण्याचे कलम अंतर्भूत करणे म्हणजे अनिश्‍चित काळासाठी भाडेकरार केला न गेल्याचा पुरावा मानला जाणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. त्याचप्रमाणे कालांतराने किरकोळ स्वरूपात भाडेवाढ करण्याचे कलमही अशा प्रकारचा पुरावा ठरू शकत नाही. भाडेकरारात कालांतराने भाडे वाढविण्याचे कलम अशासाठी आवश्‍यक असते की, दीर्घकाळ भाडे वाढविले नाही तर भाडे स्थिर दरानेच आकारले जाईल, असे करारात मान्य केल्याचे गृहित धरले जाते. अब्दुलरहीम फूनुमुल्ला विरुद्ध साराफली मुहम्मदअली खटल्यात भाडेकरार 25 वर्षांसाठी करण्यात आला होता. परंतु करारात असा उल्लेख करण्यात आला होता की, जर भाडेकरूने नियमित स्वरूपात भाडे भरले, तर तो घरावर कब्जा कायम ठेवू शकतो. सन 1928 मध्ये जोपर्यंत भाडेकरू नियमित स्वरूपात भाडे भरत राहील, तोपर्यंत तो घरावर कब्जा कायम ठेवू शकतो.

ही सारी प्रकरणे पाहता, भाडेकरारात कालावधीचा सुस्पष्ट उल्लेख असणे अत्यावश्‍यक ठरते. केवळ ठराविक अंतराने भाडे वाढवून मागण्याच्या अधिकाराचा समावेश भाडेकरारात असणे पुरेसे नाही. कारण त्याचा अर्थ असा नाही की, भाडेकरू घरावर कायमस्वरूपी कब्जा करूच शकत नाही. भाडेकरारात भाडेकरूला घर खाली करण्यास सांगण्याचा अधिकारही घरमालकाकडे सुरक्षित असल्याचा उल्लेख असायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)