भाडेकरूचा घरमालकाच्या दागिन्यांवर डल्ला

नगर: घरमालक बाहेरगावी असल्याचा फायदा घेत भाडेकरूने घरातून सुमारे 2 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गौरीघुमट येथे धारावाडा आनंदीबाजार येथे ही घरफोडी दोन दिवसापूर्वी झाली होती. या चोरीत भाडेकरू रवींद्र शंकर ताटीकोंडा याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकटेश रामैय्या बुरा (वय 70) यांनी फिर्याद दिली आहे.

बुरा हे हैद्राबाद येथे लग्न कार्यासाठी गेले होते. भाडेकरू याने रवींद्र ताटीकोंडा याने त्याचा फायदा घेत घरमालक बुरा यांच्या घराचे कुलूप तोडून अडीच लाख रुपयांच्या ऐवज चोरून नेला. ताटीकोंडा याने बुरा यांच्या घरात चोरी करताना चांगलाच धुमाकूळ घातला होता. कपाटाचे लॉक तोडून त्यातून दागिने चोरून नेले. बुरा हे हैद्राबाद येथून आल्यावर कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली. चोरीमागे कोण आहे, याचा बुरा यांना देखील सुरूवातीला संशय नव्हता.

पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे हे तपास करत होते. त्यावेळी बुरा यांना चोरी झाल्यापासून त्यांच्याकडील भाडेकरू ताटीकोंडा हा पसार असल्याचे लक्षात आले. बुरा यांनी गोकावे यांना ही माहिती तपासात दिली. गोकावे यांनी त्यानुसार एक तपास पथक तयार केले. ताटीकोंडा हा नगर-मनमाड रोडवरील राहुरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी तिथे सापळा लावला. पोलिसांनी ताटीकोंडा येथून ताब्यात घेत अटक केले. न्यायालयासमोर पोलिसांनी ताटीकोंडा याला हजर केले. न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत (ता. 2) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)