भाडेकरुंची माहिती न दिल्यामुळे गुन्हा दाखल

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील एका घरमालकाच्या विरोधात भाडेकरुची माहिती पोलीस स्टेशनमध्ये न दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी सागर गायकवाड यांनी दिली.
गुन्हा दाखल केलेल्या घर मालकाचे नाव विष्णू गोविंद हिंगे आहे. हिंगे यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये चार वर्षांपासून भाडेतत्वावर रुम भाड्याने दिल्या होत्या. त्यामध्ये मोहम्मद शाहिद अन्सारी, मोहम्मद आजाद आणि इतर 15 जण राहत होते; परंतु त्यांनी याची माहिती पोलीस स्टेशन मध्ये दिली नाही. त्यामुळे पोलीस उपनिरिक्षक एस. एस. पांचाळ, कर्मचारी सागर गायकवाड, एस. वाय. चित्तारे यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच हिंगे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्याचे सागर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)