भाडेकरुंची माहिती न दिल्यास होणार कारवाई

शिवनेरी- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 खाली प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडेकरूंची माहिती देणे घर मालकांना बंधनकारक केले आहे. यामुळे ही माहिती लवकरात लवकर देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी दिले आहे.
ओतुर पोलिसांनी कलम 188 अंतर्गत अकरा घरमालकांवर भाडेकरुंची माहिती न दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. तसेच जुन्नर न्यायालयात हजर करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 21 घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली आहे, अशी माहिती पोलीस हवालदार पंकज पारखे यांनी दिली. तर ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक भाडेकरु अवैध पद्धतीने राहत आहेत. त्यांची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी भाडेकरुंची माहिती देणे महत्त्वाचे असल्याचे पोलीस उपनिरिक्षक येम्मेवार व डौले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)