• धरणाच्या भिंतींवर झुडपांचे जाळे ः प्रशासनाचे दुर्लक्ष

जोगवडी – ब्रिटिशांच्या राजवटीत भाटघर धरण दगडामध्ये भक्कम बांधले असून, त्याला आता 91 वर्षे पूर्ण झाली आहेत. बांधकाम भक्कम असले तरी भाटघर धरणाच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने धरणाच्या बांधकामावर झाडेझुडपे उगवली आहेत. या झुडप्यांच्या मुळ्या बांधकामाच्या आत शिरल्यामुळे बांधकाम सैल होत आहे आणि याची वेळेवर काळजी घेण्याची गरजेचे आहे; परंतु संबंधित अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करीत आहेत.
या धरणाच्या भिंतींचे 190 फूट उंचीचे भक्कम दगडी बांधकाम आहे. 23.75 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध येथे होतो. धरणाच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि पूर्वेकडील भागातील शेती सिंचनासाठी केला जातो. पूर्वेकडील भिंतीलगत वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी आणि पाणी सिंचनासाठी दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात केला जातो. भाटघर धरणाला एकूण 81 दरवाजे असून 45 दरवाजे स्वयंचलित आहेत.
भाटघर धरणाच्या भिंतीवर अंदाजे पाच ते सहा फूट उंचीची झाडेझुडपे उगवली असून, याची मुळे बांधकामात रुतलेली आहेत, त्यामुळे बांधकाम कमकुवत होण्याचा संभव आहे. याची काळजी वेळेत न घेतल्यास मोठा अनर्थ होण्याचा संभव असल्याने भाटघर प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे. भाटघरधरणाच्या भिंतीवरील झाडेझुडपे काढावीत आणि धरणाचे आयुष्य वाढवावे, अशा मागणीची चर्चा स्थानिक नागरिक करीत आहेत.

भाटघर प्रशासकीय कर्मचारी श्री नाना कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार भिंतीवर शेवाळ झाल्याने झाडेझुडपे काढलेली नाहीत; परंतु प्रत्यक्षात भिंतीवरील शेवाळ अंदाजे जास्तीत जास्त दोन महिन्यापासून झालेले आहे, तर झाडेझुडपे अंदाजे पाच ते सहा फूट आहेत. एवढ्या उंचीची झुडपे होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

रासायनिक फवारणीची गरज
पुलाच्या दगडी खांबावरील किंवा धरणाच्या भिंतीवर झाडे उगवत असल्यास त्यांना मुळासकट उपटून रासायनिक फवारणी करण्याची गरज आहे, यामुळे पूल किंवा धरणाचे आयुष्यमान वाढू शकेल असा सल्ला समजदार नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)