भाज्यांची आवक घटून भाव वाढले

संग्रहित छायाचित्र

चाकण बाजार भाव : सलग तिसऱ्या आठवड्यात कांद्याची आवक वाढली

चाकण- येथील बाजारात कांद्याची आवक सलग तिसऱ्या आठवड्यात आवक 7605 क्विंटलने वाढली तर भाव 100 रुपयाने घसरले. तर बटाटा आवक 270 क्विंटल ने वाढून भाव 100 रुपयाने वधारले. हिरवी मिरची, टोमाटो, दुधी भोपळा, वांगी, कारली, वाटाणा, शेवगा, गवार या भाज्यांची आवक घटली व भाव वाढले. या आठड्यात भूईमुग शेंग आवक व भाव स्थिर झाली तर गेल्या शनिवारच्या तुलनेत लसूण आवक व भाव स्थिर झाले. तर भाज्यांची आवक घटली. जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली. बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 32 लाख रुपये झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची एकूण आवक 22 हजार क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 800 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 860 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 270 क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव एक हजार रुपयांवर आला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 05 क्विंटल झाली, भाव 5 हजार रुपयांवर स्थिर झाले. लसणाची एकूण आवक 8 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव या आठवड्यात 2 हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 440 पोती झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 105,000 जुड्यांची आवक होऊन 600 ते 1600 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 45 हजार जुड्यांची आवक होऊन 900 ते 1800 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.

  • जनावरांच्या बाजारात 2 कोटींची उलाढाल
    चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 95 जर्शी गायींपैकी 46 गायींची विक्री झाली त्यांना 10 ते 70 हजार रुपये, 120 बैलांपैकी 75 बैलांची विक्री झाली त्यांना 20 ते 40 हजार रुपये, 225 म्हशींपैकी 145 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 90 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 11, 420 शेळ्या-मेंढ्यापैकी 9, 770 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,500 ते 12 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 10 लाख ते 2 कोटी 20 लाख रुपये उलाढाल झाली

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)