भाजे-लोहगड दरम्यान रविवारी “संपर्क’चा हेरिटेज वॉक

कार्ला – मावळ तालुक्‍यातील ऐतिहासिक वास्तुंचे जतन व्हावे तसेच त्यांची “युनेस्को’च्या यादीत नोंद व्हावी याकरिता येत्या रविवारी (दि. 25) संपर्क बालग्राम या संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान “हेरिटेज वॉक’चे आयोजन केले होते. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार संभाजी महाराज, अभिनेत्री गिरिजा ओक, संपत स्वरुप, परेश रावल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सुमारे सहा ते सात हजार दुर्गप्रेमी, निर्सगप्रेमी व नागरिक या “वॉक’मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संपर्क संस्थेचे सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत दडलेल्या भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान या वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्‍यातील भाजे लेणी, कार्ला लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला व विसापूर किल्ला या पुरातन व ऐतिहासिक वास्तूंची युनेस्कोमध्ये नोंद होऊन या भागाचा पर्यटनात्मक दृष्टया विकास व्हावा या करिता भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क बालग्राम या अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्थेच्यावतीने मागील तीन वर्षांपासून हेरिटेज वॉक ही नावीन्यपूर्ण संकल्पना समाजासमोर ठेवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)