भाजे ते लोहगड दरम्यान परदेशी पाहुण्यांसह नागरिकांची “हेरिटेज वॉक’द्वारे सलामी!

  • खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन
  • कलाकारांसह पाच हजार नागरिकांचा सहभाग

कार्ला – महाराष्ट्राचा सांस्कृतिक व प्राचीन वारसा जपण्याच्या उद्देशाने “संपर्क हेरिटेज वॉक द ग्लोरी ऑफ महाराष्ट्र’ (संपर्क प्राचीन वारसा पददिंडी) संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 25) मावळ तालुक्‍यातील संपर्क बालग्राम भाजे-लेणी पायथ्यापासून लोहगड किल्ल्यापर्यंत पददिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या पददींडीची सुरवात भाजे गावातून करण्यात आली. पददिंडीचे उद्‌घाटन खासदार संभाजीराजे भोसले, आमदार संजय भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, संपर्क संस्थेचे प्रमुख अमितकुमार बॅनर्जी, सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, सरंपच चेतन मानकर, “सॅंडविक’चे अरविन, नेव्ही कप्टन के श्रीनिवास, सीआरपीएफ डीआयजी सचिन गायकवाड, ब्रिजस्टोन पराग सातपुते, सिनेअभिनेत्री गिराजा ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, जिल्हा परिषदेच्या सदस्या अलका धानिविले, माजी सभापती ज्ञानेश्‍वर दळवी, माजी सभापती शरदराव हुलावळे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिपक हुलावळे, तळेगाव माजी उपनगराध्याक्ष संतेद्ररराजे दाभाडे, रत्ना बॅनर्जी, उपसरपंच सुनीता दळवी, नगरसेविका बिंद्रा गणत्रा, जयश्री आहेर, नगरसेवक संतोष भेगडे, नारायण पाळेकर, देवले माजी सरंपच निकीता आंबेकर, माजी उपसरपंच सुभाष साठे, किरण हुलावळे, माजी उपसरपंच रामभाऊ गोणते, माजी सरंपच नंदकुमार पदमुले, रघुनाथ मराठे, अशोक दळवी, दिनेश ढगे, गोरख दळवी, दिलीप भालेराव, अरुण काळे, बेबीताई हुलावळे, कैलास हुलावळे, अमोल केदारी, शरद कुटे, हेमंत भानुसघरे उपस्थित होते.

सहासी खेळ अन्‌ दांडपट्‌टा!
या पददिंडीचा सात किलोमीटरची प्रवास होता. सुरवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत ढोल-लेझीम वाजवत सुहासिनिंनी औंक्षण करत महाराष्ट्राचा साहसी खेळ दांडपट्टा व तलवार बाजी करत मिरवणूक काढण्यात आली. तसेच काही अंतरावर परिससरातील इतिहास प्रेमी शालेय विद्याथी ऐतिहासिक जीवंत देखावे सादर करुन भारतीय सांस्कृतिक वारसा दर्शन घडवणारे महिला फेर धरत झिम्मा फुगड्यांचा खेळ, पोतरांजाचा खेळ, भजन, पोवाडे सादरीकरण, जागरण गोंधाळाचा कार्यक्रम, महाराष्ट्राची सांस्कृतिक दाखवणारे कार्यक्रम, शिवाजी महाराज, मराठे मावळे यांच्या वेशभूषा धारण करत संस्कृतीचे दर्शन घडवले जात होते. तसेच मार्गावर विविध ठिकाणी महाराष्ट्रीय खाद्य पदार्थाचे झुनका भाकर, चटणी भाकर, ठेचा, मक्‍याचे कणीस, भाजलेले शेंगदाणे, हरभरा, वडापाव या सारखे स्टॉल लावण्यात आल्याने खाद्य पदार्थांचा इतिहास प्रेमींना आस्वाद घेता येत होता.

पददिंडीचा प्रमुख उद्देश…
मावळ तालुक्‍यातील भाजे, कार्ला, बेडसे, लेणी व लोहगड, विसापूर किल्ले या स्थळांची नोंद युनोस्कोमध्ये व्हावी तसेच या स्थळांना हेरिटेज दर्जा मिळावा आणि या अनमोल अशा प्राचीन वारसांचे जतन करणे आहे. तसेच या पददिंडिच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करणे व जतन करणे आहे. याशिवाय महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक मुल्यासोबत अनाथ व गरजू अशा बालकांची काळजी व जीव सरंक्षणाबाबत जाणीव व जागृती होणे असा आहे.

कोळी नृत्याने आणली रंगत…
यामुळे पर्यटन व्यवसाय वाढवून परिसरातील स्थानकासाठी रोजगार निर्मिती व व्यवसाय वाढून आजूबाजुच्या गावांच्या विकासाला मदत होईल. पददिंडीची सांगता लोहगड किल्ल्याजवळ स्थानिक कलाकारांद्वारे महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमांतर्गत संपर्कच्या मुलींनी कोळी नृत्य सादर करत आलेल्या पाहुण्यांची वाहवा मिळवली. तसेच त्याठिकाणी ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन ही भरवण्यात आले होते.

पाहुण्यांसाठी झुणका-भाकर अन्‌ ठेचा…
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगड गावात पाहुण्यांसाठी झुणका भाकरी व ठेचा असे भोजनाचे आयोजनही करण्यात आले होते. संपर्क संस्थेद्वारे प्रथमच घेण्यात आलेल्या “हेरिटेज वॉक’ला पुणे-मुंबईच्या नावाजलेल्या कंपनीचे पदाधिकारी, स्थानिक गावकरी, इतिहास प्रेमी परिसरातील शाळा, महाविद्यालय विद्याथी तसेच सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, संघटना, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होते. “हेरीटेज वॉक’ यशस्वीतेसाठी संपर्कचे प्रमुख विश्‍वस्त अमितकुमार बॅनर्जी, सर्व विश्‍वस्त पदाधिकारी, सर्व संस्था, पदाधिकारी सेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)