भाजी विक्रेत्यास ग्राहकाची मारहाण

पिंपरी – फुकट काकडी देण्यास विरोध केल्यामुळे एका भाजी विक्रेत्यास दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना संभाजीनगर येथे घडली.

रोहीत कांबळे (वय-18), ऋषीकेश संजय जाधव (वय-18), बंटी क्षीरसागर (वय-19) आणि सोन्या अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय संजय वाघमारे (वय-18, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

अजय यांचा लहान भाऊ भाजीचा व्यवसाय करतो. मंगळवारी सायंकाळी तो संभाजीनगर परिसरात भाजी विकत असताना आरोपी तिथे आले व पिशवीमध्ये काकडी भरण्यास सुरुवात केली. त्यास संजय यांच्या भावाने विरोध केला या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)