भाजी विकेत्यांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्र्यांचे वाटप : आ. संगाम जगताप  

सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा
नगर – मार्च महिना सुरू झाला असला, तरी उन्हाची तीवता खूपच जाणवू लागली आहे. अजून तर कमीत कमी तीन महिने उन्हाच्या तीवतेला प्रत्येकालाच सामोरे जायचे आहे. रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या विकेत्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. आ. अरुण जगताप यांचा वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून विविध संस्था व मंडळांद्वारे सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. समाजातील वंचितांना मदत केली जाते. चितळे रोड हातगाडी, भाजी विकेते संघटनेचा हा उपकम निश्‍चितच चांगला आहे, असे प्रतिपादन आ. संगाम जगताप यांनी केले.
चितळे रोड हातगाडी, भाजी विकेते संघटनेच्या वतीने आ. अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भाजीविकेत्यांना आ. संगाम जगताप यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, शरद मडूर, कार्तिक भगत, साहेबान जहागीरदार, राजू चौधरी, मनीषा येणारे, संतोष लोखंडे, संजय धारक, बाळासाहेब देशमुख, वसंत गुगळे आदी उपस्थित होते.
आ. संगाम जगताप पुढे म्हणाले, उन्हाची तीव्रता पाहता वाटसरूंची पाण्याची सोय व्हावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू होणे गरजेचे आहे. सामाजिक संस्थांनी पुढे येऊन शहरात थंडगार पाणी मिळेल, अशी व्यवस्था करावी, असे ते म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे म्हणाले, आम्ही दरवर्षी आ. अरुण जगताप व आ. संगाम जगताप यांचा वाढदिवस सामाजिक उपकम राबवून साजरा करतो. यंदाच्या वर्षी विकेत्यांना व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना छत्री देऊन करण्यात आला. उन्हाची तीवता चांगलीच वाढली असून, त्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा उपकम राबविण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)