भाजीविक्रेत्या पतीने दिली पत्नीला किडनी

ससूनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया : प्रत्यारोपणासाठी अजून 15 रुग्ण “वेटिंग’वर

पुणे- आजपर्यंत आपण सत्यवानाच्या सावित्रीपासून ते अगदी आतापर्यंतच्या घटनांमध्ये पत्नीने पतीच्या प्राणाचे कसे रक्षण केले, याच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. मात्र, पुण्यात पतीने स्वत:चा जीव धोक्‍यात घालून पत्नीचा जीव वाचविला आहे. हडपसर येथील 48 वर्षीय उत्तमराव गोळे यांनी आपल्या पत्त्नीला किडनी देत तिला नवीन आयुष्य दिले आहे.
महादेवनगर परिसरातील या 42 वर्षीय महिलेला 2011 पासून किडनीविकार झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात छोटे-मोठे उपचारही झाले. मात्र, आर्थिक परिस्थिती पाहता त्यांनी ससून रुग्णालयात दाखल होण्याचे ठरविले. ससूनमध्ये त्यांचे डायलिसिस सुरू केले होते. ससूनच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्लाही दिला होता. परंतु, पती भाजी विक्रेते, मुलगा शिक्षण घेत असलेला अशा स्थितीत आर्थिक प्रश्‍न उभा राहिला होता. उत्तमराव हे त्यांच्या घरातील एकमेव व्यक्ती कमावती व किडनीदाता असल्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा खर्च परवडणारा नव्हता. ससूनकडून देण्यात येणाऱ्या देणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे मूत्र पिंड प्रत्यारोपण करण्याचे ठरले. त्यानुसार 13 जुलै रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
या पथकात ससूनचे डॉक्‍टर सुरेश पाटणकर, भालचंद्र काश्‍यपी, अभय सदरे, निरंजन आंबेकर, धनेश कामेरकर, राजेश श्रोत्री, अभिजीत पाटील, अमित बंगाळे, सागर भालेराव, शंकर मुंडे, विद्या केळकर, सुरेखा शिंदे, रोहित संचेती, सुरज जाधवर आदी डॉक्‍टरांचा या पथकात समावेश होता. जिवंत दाता असलेले तिसरे किडनी प्रत्यारोपणआहे. तर ससूनमधले एकूण सातवे आहे.
दरम्यान, अजून 15 रुग्ण ससूनच्या किडनी प्रत्यारोपनाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत आणि यकृत प्रत्यारोपणससाठी 5 रुग्ण नोंदणी प्रक्रियेत आहेत. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी देणगीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. ज्यामुळे प्रत्यारोपणाचा खर्च न परवडणारी कुटुंबेसुद्धा प्रत्यारोपनाचा पर्याय स्वीकारतील. ससूनला दिलेल्या देणगीवर “80-जी’ कलमांतर्गत सुविधा उपलब्ध असल्याचे ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)