भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

हैदराबाद : यंदाच्या हंगामात जसजसा तापमानाचा पारा चढत आहे, तसे भाजीपाल्याचे भावदेखील चढत असल्याची नोंद होत आहे.

हैदराबाद येथे भाजीपाल्याचे भाव मागील १० दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले असून येत्या मे मध्ये हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात टोमॅटोचे भाव आठवड्यापूर्वी ७रु./किलो होते. मात्र आता हे भाव १७रु./किलोपर्यंत पोहचले आहेत. भाजीपाल्याचे उत्पादन मंदावल्याने घरगुती ग्राहकांना येत्या काही दिवसांत भाजी खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)