भाजीपाल्याची भाव घसरले!

  • आवक जादा : कांदा दरांत मात्र वाढ

पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोशीतील नागेश्‍वर उपबाजारात भाजीपाल्याची 761 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये 251 क्विंटलची घट झाली आहे. यामध्ये पालेभाज्यांची 16 हजार 115 गड्डयांची आवक झाली आहे. फळभाज्यांबरोबरच पालेभाज्यांची आवकदेखील घटली आहे.

गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव वधारल्याने या आठवड्यात कांद्याची आवक 119 क्विंटलने घटली असून, सरासरी भावात 350 रुपयांची घट झाली आहे. कांद्याला मागणी वाढल्याने प्रतिकिलो 40 रुपये दराने कांद्याची विक्री होत आहे. बटाट्याचे भाव 100 रुपयांनी घटले असून आवकेतही 111 क्विंटलची घट झाली आहे. भेंडीची आवक तीन क्विंटलने घटूनही, भावातही 500 रुपयांची घट झाली आहे. गवारीची आठ क्विंटलने आवक घटली असून, भावातही 500 रुपयांची घट झाली आहे. टोमॅटोचा भाव स्थिरावला असून आवकेत 13 क्विंटल, तर भावात 500 रुपयांची घट झाली आहे. मटारचे दर 400 रुपयांनी घटले असून, आवकदेखील सात क्विंटलने घटली आहे. घेवड्याची आवक तीन क्विंटलने घटली असून, भावात 500 रुपयांची घट झाली आहे. दोडक्‍याची आवक तीन क्विंटलने घटूनही भावात 250 रुपयांची वाढ झाली आहे.

मिरचीची आवक पाच क्विंटलने वाढली असून, भवात 750 रुपयांची वाढ झाली आहे. दूधी भोपळ्याची सात क्विंटल आवक वाढली असून, भावात 150 रुपयांची वाढ झाली आहे. भूईमूग शेंगांची आवक सात क्विंटलने घटली असून, भावात 250 रुपयांची घट झाली आहे. काकडीची आवक 16 क्विंटलने घटली असून, भावात 100 रुपयांची घट झाली आहे. कारल्याची आवक चार क्विंटलने घटली असून, भावात 500 रुपयांची घट झाल आहे. फ्लॉवरची आवक सहा क्विंटलने तर भाव 250 रुपयांनी वाढले आहेत. कोबीची आवक नऊ क्विंटलने वाढून भावातही 200 रुपयांची वाढ झाली आहे. वांग्यांची आवक 16 क्विंटलने घटली असून, भाव मात्र स्थिर आहे. वालवरची आवक स्थिर असूनही भावात 250 रुपयांची घट झाली आहे. लसूण व आल्याची आवक एक क्विंटलने घटली असून, भाव मात्र स्थिर आहेत. डांगर व गाजराची आवकदेखील स्थिर आहे. पावट्याची आवक दोन क्विंटलने घटली असून, 600 रुपयांनी भाव घटले आहेत. लिंबांची आवक पाच क्विंटलने घटली असून, भाव मात्र 150 रुपयांनी वाढले आहेत. मक्‍याची आवक दोन क्विंटलने घटली असूनही भाव मात्र स्थिर आहेत.

कोथंबिरीची आवक घटली…
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या 7 हजार 310 गड्डयांची आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 1 हजार 860 गड्डयांची आवक घटली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात कोथंबिरीच्या भावाने उचल खाल्ली आहे. तसेच, मेथीची 2,890 गड्ड्या, शेपू 1970 गड्डया, पालक 2230 गड्डया, मुळा 750, पुदीना 450 गड्डया, चवळई 120 गड्डया आवक झाली. किरकोळ बाजारात सर्वच पालेभाज्याची विक्री प्रति नग 10 रुपयांना होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)