भाजयुमो नेत्याची राहुल गांधींवर अश्‍लाघ्य टीका

अहमदाबाद – भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) राष्ट्रीय सरचिटणीस अभिजात मिश्रा यांची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यांनी राहुल यांचा उल्लेख मनोरूग्ण म्हणून केला.

मिश्रा मंगळवारी येथे भाजयुमोच्या मेळाव्यात बोलत होते. राहुल बाबा कॉंग्रेसचे अध्यक्ष असेपर्यंत भाजपला चिंता करण्याची गरज नाही. ते अध्यक्ष असणे आमच्यासाठी चांगलेच आहे. त्यांच्याकडे नेतृत्व सोपवल्याबद्दल मी कॉंग्रेसचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न राहुल करत आहेत. तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले बालक पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहत आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्यांचा आदर्श युवकांनी समोर ठेऊ नये. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मंगल पांडे, गुरू गोविंदसिंग यांना युवकांनी आदर्श मानावे, असे आवाहनही त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)