भाजप-सेना युती सरकारचा ढोल आता राष्ट्रवादी बडवणार- NCP

रायगड : २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तारूढ भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांकडून सत्ताधारी पक्षाचे ‘अपयश’ जनतेपुढे मांडण्यासाठी आजपासून राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा रायगडावर शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करून राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले.

अच्छे दिनचे पोकळ ढोल बडवणार्‍या भाजप-सेना युती सरकारचा ढोल आता राष्ट्रवादी बडवणार असल्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)