भाजपचे सरकार म्हणजे, सैराट सरकारचा झिंगाट कारभार

पुणे: भाजप सरकार म्हणजे केवळ फेकाफेकी आणि घोषणाबाजीचा कारखाना असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाकडून जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. भाजपचे सरकार म्हणजे, सैराट सरकारचा झिंगाट कारभार असल्याची टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाजप सरकारला नियोजनबध्द विकास करता येत नाही. रोजगार निर्मिती, कृषी व्यवस्थापन जमलं नाही. महागाईने, बेरोजगारीने, नागरी सेवांच्या अभावाने सामान्य माणूस त्रासलेला आहे . शेतकऱ्यांच्याही समस्या सुटल्या नाही. या नाकर्त्या सरकारविरुद्ध जनसंघर्ष यात्रेत सामील व्हा! , असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. कात्रज पुणे येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनसंघर्ष यात्रेच्या सातव्या दिवसाची सुरवात आज झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)