भाजप सरकारने एकही चांगले काम केले नाही-ओमप्रकाश राजभर

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ सरकारच्या कॅबिनेटमंत्र्याने भाजप सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. ओमप्रकाश राजभर यांनी राज्यातील भाजपा सरकारने एकही चांगले काम केले नाही असे म्हटले आहे. कॉंग्रेस सरकारला कंटाळून जनतेने ज्याप्रकारे पर्याय म्हणून मोदींना निवडले, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील जनता पर्याय शोधेल असे ते म्हणाले. ओमप्रकाश राजभर हे सुहेलदेव भारत समाज पार्टीचे अध्यक्ष असून उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे ४ आमदार आहेत.

ज्यावेळी जनतेला कॉंग्रेसव्यतिरीक्त पर्याय मिळाला त्यावेळी लोकांनी मोदींना निवडण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांमध्ये जनता आणखी चांगला पर्याय शोधण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजभर म्हणाले. जनतेने आम्हाला निवडलं पण आम्ही अजूनपर्यंत कोणते चांगले काम केलं? असा सवाल त्यांनी विचारला. जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे. यापूर्वीही राजभर यांनी उलट-सुलट विधान केली आहेत. राज्यसभा निवडणुकांआधी त्यांनी युती तोडण्याची आणि सरकार सोडण्याची धमकी दिली होती, पण त्यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची समजूत काढली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)