भाजप सत्तेवर आल्यापासून धार्मिक शांतता आणि सौहार्दतेला धक्का बसला- अजित पवार

मुंबई: 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण अचानक रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे पत्र आयोजकांनी त्यांना पाठविले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या भाषणाने वाद निर्माण होण्याच्या भीतीपोटी हे पाऊल संमेलन आयोजकांनी उचलल्याची चर्चा आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.  देशात आणि राज्यातही वातावरण चांगलं नाही, हेच नयनतारा सहगल यांच्या या घटनेवरुन सिद्ध होतं. हे सरकार सत्तेवर आल्यापासून धार्मिक शांतता आणि सौहार्दतेला धक्का बसलेला आहे. वातावरण शांत करण्यापेक्षा हे सरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करताना दिसत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)