भाजप शिवसेनेला सोडणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – शिवसेना जरी स्वबळाचा नारा देत असली तरी भाजप त्यांना स्वबळावर लढू देणार नाही असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. त्यामुळं भाजप आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला सोडणार नाही असं भाकीत त्यांनी वर्तवलं.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या दिवशी झालेल्या बैठकीत आता येणाऱ्या सगळ्याच निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या.सत्तेत आल्यापासूनच शिवसेना सरकारवर प्रचंड टीका करते आहे.

सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका बजावते आहे. या साऱ्यावर भाष्य करताना आगामी निवडणुकीत काँग्रेस समविचारी पक्षांसोबत एकत्र येऊन भाजपचा मुकाबला करेल असंही ते म्हणाले. भाजप विरोधकांमध्ये फूट कशी पाडता येईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी  केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)