भाजप, शिवसेनेमध्ये युती व्हावी – शिरोळे

पुणे – भाजप आणि शिवसेनेमध्ये युती व्हावी ही नेत्यांची व माझीही इच्छा आहे. युती न झाल्यास मतांचे विभाजन होऊ शकते. अशावेळी भाजपाला पुण्यात विजयासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील, असे खासदार अनिल शिरोळे यांनी येथे स्पष्ट केले.

केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याबद्धल विकसकामांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,लोकसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे तर, विरोधकांकडे उमेदवार दिसत नाहीत. कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. चव्हाण प्रतिस्पर्धी उमेदवार असतील तर, उत्तमच भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे हे पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या मुद्‌द्‌यावर बोलताना शिरोळे म्हणाले की, विरोधात कोण आहे हे न पाहता आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांच्या समोर जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)