भाजप-शिवसेनेच्या विचारात समानता : मुनगंटीवार 

मुंबई: भाजपचा जो विचार आहे, तोच शिवसेनेचाही आहे. आमच्या विचारात समानता आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मित्राने आपल्याशी स्पर्धा केली, तर त्यात गैर काहीच नाही, असे भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे ही देशातल्या प्रत्येक हिंदूच्या मनातली भावना आहे. शरयूच्या काठावर आज उद्धव ठाकरे जी महाआरती करणार आहेत, त्याचा देशाचा नागरिक म्हणून मला आनंदच आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. भाजपचा जो विचार आहे, तोच शिवसेनेचाही आहे. आमच्या विचारात समानता आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह ज्यासाठी आग्रही आहेत, तोच आग्रह उद्धव ठाकरेंचाही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“पहले मंदिर, फिर सरकार’ ही उद्धव ठाकरेंची भूमिका असू शकते. याचा अर्थ मंदिर बांधण्याचे काम लवकर सुरु व्हावे, निवडणुका घेऊ नये किंवा शिवसेना-भाजपने एकत्र येऊ नये, असा उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत नसावा. प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील. आधी जर युतीसाठी “स्टेट हायवे’ होता, तर आता अयोध्याच्या निमित्ताने “राष्ट्रीय मार्ग’ तयार होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

राम मंदिर हा मताचा विषय नाही, ती कोट्यवधी जनतेच्या मनाची आस्था आहे. निवडणुकीचा मुद्दा फक्त आणि फक्त विकासाचा असू शकतो. दीन-दुर्बलांना न्याय मिळावा, वंचितांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य मिळावे, हा निवडणुकीचा मुद्दा आहे. राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे. मंदिर हा एका पक्षाचा विषयच नाही, यासाठी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन एकमत केले पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)