भाजप-शिवसेनेची मॅच फिक्‍सिंग…

अशोक चव्हाण : सरकारचे आतून किर्तन बाहेर तमाशा
मुंबई – नाणारवासियांना फसणवीस सरकार फसवत असून नाणार रिफायनरीबाबत जे काही चालले आहे ती भाजप शिवसेनेची मॅच फिक्‍सिंग आहे. दोन्ही पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत असून सरकारचे आतून किर्तन बाहेर तमाशा सुरु आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

नाणार गावचा औद्योगिक क्षेत्रात समावेश करणारी अधिसूचना रद्द केली असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात, तर मुख्यमंत्री म्हणतात अधिसुचना रद्द केली नाही. हायपॉवर कमिटी ही मंत्र्यापेक्षा मोठी नसते मात्र मुख्यमंत्र्यांनी हायपॉवर कमिटी मोठी आहे असे म्हणून आपल्या मंत्र्यांची वाईट अवस्था केली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नाहीत. जनाची नाही तरी मनाची थोडीशी जरी लाज असेल तर सुभाष देसाई यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शिवसेनेने सत्तेबाहेर पडले पाहिजे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

नाणारबाबत सरकारमधील लोकांची परस्पर विरोधी विधाने पाहता सरड्यांनाही लाज वाटेल अशा पध्दतीने सरकार रंग बदलत आहे. कॉंग्रेस पक्ष नाणारवासियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नाणारवासियांच्या मर्जीविरोधात हा प्रकल्प या सरकारला रेटून नेता येणार नाही. नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधून कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज अहवाल आपल्याकडे सादर केला. एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन शिष्टमंडळ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळासोबत नाणारवासियही राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, असे चव्हाण म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)