भाजप शहराध्यक्षांची घोषणा ठरली ; ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’

पुणे- भाजपच्या नगरसेवकांच्या निधीतून दीडशे कोटी रुपये वाचवून तो अन्य विकास कामांना देणार असल्याची वल्गना भाजप शहराध्यक्षांनी केली खरी, परंतु त्यांची घोषणा म्हणजे “बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरली आहे. स्थायी समितीच्या चालू वर्षाच्या अखेरच्या बैठकीत शहराध्यक्षांच्या या कल्पनेला नगरसेवकांनीच सुरूंग लावला असून, स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत असा कोणताच विषय आणला गेला नाही किंवा मंजूरही झाला नाही.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वर्षपूर्तीच्या कामगिरीची माहिती देताना 14 मार्च रोजी शहराध्यक्ष गोगावले यांनी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. भाजप नगरसेवकांना चालू अंदाजपत्रकात जवळपास 600 कोटींचा निधी मिळाला आहे, त्यामधील 500 कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांमधील अनेक निविदा 30 टक्के पेक्षा कमी दराने येत असल्याने त्यामधील जवळपास 150 कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहणार असल्याचे गोगावले म्हणाले होते.

या निधीतील 100 कोटी रुपयांचानिधी पीएमपीएमएलला तर उर्वरीत प्रत्येकी 25 कोटी शिवसृष्टी आणि वृक्षारोपणासाठी वर्गीकरण करून दिला जाईल, असेही गोगावले म्हणाले होते.
त्यानंतर शहराध्यक्षांच्या आदेशानुसार स्थायी समितीत तसा प्रस्ताव आला होता. त्यावर स्थायीने प्रशासनाचा अभिप्राय मागविला होता. मात्र, मंगळवारी चालू आर्थिक वर्षातील अखेरची बैठक झाली, त्यात यासंबधीचा कुठलाही अभिप्राय आला नाही. त्यामुळे गोगावले यांच्या कल्पनेनुसार जरी निधी शिल्लक राहणार असला, तरी तो वाया (लॅप्स) जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)