भाजप विस्तारकांसाठी मंगळवारी प्रशिक्षण वर्ग

पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपच्या वतीने पक्षवाढीकरिता शहरात 26 मे ते 10 जून या काळात पूर्ण वेळ विस्तारक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी पूर्ण वेळ विस्तारकाचे काम करणार आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी येत्या मंगळवारी (दि.23) भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

या उपक्रमादरम्यान, भाजपचे सर्व नगरसेवक व पक्षाचे 300 पदाधिकारी दि.26 मे ते 10 जून या काळात पूर्ण वेळ विस्तारक म्हणून काम करणार आहेत या उपक्रमांतर्गत अनुप मोरे यांची पिंपरी विधानसभा, राजू दुर्गे यांची भोसरी विधानसभा, तर अरुण पवार यांची चिंचवड विधानसभा पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या विस्तारक योजनेस सहभागी होणाऱ्या विस्ताराकांचा एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग.23 मे 2017 रोजी होणार असून यात प्रदेश स्तरावरील वक्ते मार्गदर्शन करणार आहे. शहराध्यक्ष आमदार लक्षमण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी येथे विस्तारक उपक्रमासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली. या वेळी गटनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ व भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)