भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र यावे यासाठी सर्वप्रथम माझा पुढाकार – राज ठाकरे

रत्नागिरी – भाजप विरोधात कर्नाटकमध्ये सर्व पक्ष एकत्र यावं असा आग्रह सर्वप्रथम मी धरला होता. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि तिथून हि प्रक्रिया सुरु झाली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच रिफायनरीसाठी कोकण नाही. शिवसेना कोंकण वासियांना फसवतेय. अधिसूचना रद्द झालेली नाही. शिवसेना भाजपचे आतून मेतकूट जमलेले आहे, असे सांगत कोकणात हा प्रकल्प नको असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, माझा विकासाला विरोध नाही, पण रिफायनरीची कोकणात गरज नाही. हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्या. कोकणासारखी सुपीक जमीन देशात कुठेच मिळणार नाही. येथील फळे, जेवण आणि बुद्धिवाद अन्यत्र नाही. कोकणात मोठे झालेल्या माणसांची यादी देशात कुठेच नाही. चार भारतरत्न हे कोकणातलेच आहेत. एवढं सगळं असतानाही जागा विकून तुम्ही करणार काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. केरळसारखे पर्यटन देशात कुठेच नाही, इथेही हे शक्‍य आहे. पण इथे जो तो येतो तो म्हणतो मी विदर्भाचा, मी मराठवाड्याचा, मी पश्‍चिम महाराष्ट्राचा, असे म्हणून कसे चालेल. विकास सर्वसमावेशक असला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम आघाडी सरकारच्या काळापासून सुरु आहे. आता पाऊस जवळ आला आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या कामाची काय अवस्था आहे, दरडी कोसळतील तेव्हा काय परिस्थिती होईल. चायनामध्ये काही काळात रस्ते पूर्ण होतात. मात्र आपल्याकडे वेळकाढू कंत्राटदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी प्रयत्न होतात, मग विकास कसा होईल, असा टोला राज ठाकरे यांनी लगाविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)