भाजप वगळता अन्य पक्षांच्या वरिष्ठांची पाठ

नगर: महापालिका निवडणूक प्रचाराचा ज्वर आता वाढू लागला आहे. उमेदवार घरोघरी जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. परंतू अजूनही निवडणूक वातावरण निर्मिती झाली नाही. भाजप वगळता अन्य एकाही पक्षाच्या वरिष्ठ प्रचारासाठी शहरात फिरकले नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांकडून प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.

महापालिका निवडणुकीची प्रचार यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. वाहन, फलक, सभा घेण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार वैतागले आहे. उमेदवारांच्या प्रचारांच्या वाहनांनी परवानगी मिळत नसल्याने शहरात बोटावर मोजता येईल एवढी वाहन सध्या प्रचार करीत आहे. भाजपने शहरातील प्रमुख मार्गावर फलक लावले आहे. मात्र अन्य एकही पक्षाचे फलक अद्यापही झळकले नाही. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. आता प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहे.

या दरम्यान शहरात प्रचार सभा व ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारामुळे वातावरण निवडणूक मय होणे आवश्‍यक आहे. परंतू भाजपच्या काही सभा सोडल्यानंतर अन्य पक्षाच्या सभा झाल्या नाही. त्यामुळे अन्य पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते हैराण झाले आहेत. त्यांना स्थानिक नेत्यांकडून पाठबळ मिळत नसल्याची तक्रार उमेदवारांकडून आता होऊ लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)