भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सरळ लढत

विद्यमान चार नगरसेवकांसह दोन माजी नगरसेवक रिंगणात

प्रतिष्ठेची लढत प्रभाग 1

नगर: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा भाग आता राष्ट्रवादी व भाजपमध्ये विभागला गेल्याने शिवसेनेचे अस्तित्व या भागात तसे संपुष्ठात आले आहे. या भागात मोठी ताकद असलेले उमेदवार राष्ट्रवादीने दिले आहेत. त्यात तीन विद्यमान नगरसेवक आहेत. तर भाजपकडून देखील एक विद्यमान नगरसेवकांसह तगडे उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या तुलनेत शिवसेनेकडून सर्वच नवखे उमेदवार देण्यात आल्याने सध्या तरी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सरळसरळ लढत होत आहे.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने संपत बारस्कर यांच्या रुपाने शिरकाव केला. तेव्हापासून या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यात शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक डॉ. सागर बोरूडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून या प्रभागात राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असतांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी शिवसेनेचे तिकीट नाकारून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. त्यामुळे या प्रभागात आता दोन बारस्कर एकत्र आले आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होवून सागर बोरूडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्‍यता आहे. परंतू असे असले तरी भाजपच्या उमेदवारांचे तगडे आव्हान सध्या तरी राष्ट्रवादीसमोर उभे आहेत.भाजपचे उमेदवार देखील सक्षम असल्याने तसेच भाजपकडून उमेदवारांना चांगलीच ताकद देण्यात येत असल्याने राष्ट्रवादी याबाबत कमी पडत आहेत.

राष्ट्रवादीकडून प्रभागनिहाय नियोजन केले आहेत. राष्ट्रवादीच्या यादीत हा संपूर्ण प्रभाग त्यांनी एमध्ये घेतला आहे. या ठिकाणी चारही उमेदवार विजयी होतील. असा त्यांचा दावा आहे. चार नाही तर तीन तरी येणार असा त्याचा दावा आहे. परंतू भाजपचे नियोजन पाहता राष्ट्रवादीला मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे. भाजपकडून विद्यमान नगरसेविका शारदा ढवण यांचा या भागात मोठा प्रभाव आहे. त्याबरोबर नव्याने विद्या दगडे, संदीप कुलकर्णी यांच्यासह माजी नगरसेवक अशोक कानडे हे निवडणूक रिंगणात उभे आहे. ढवण यांना अन्य दोन उमेदवारांना बरोबर घेवून जावे लागणार आहे.

कानडे यांनी आपल्यापरीने नियोजन केले आहे. संपत बारस्कर यांच्या विरोधात कुलकर्णी लढत देत आहे. भाजपच्या सर्वच उमेदवारांना भाजपकडून जोरदार ताकद देण्यात येत आहे. मात्र त्या मानाने शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकद मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना जोरदार संघर्ष करावा लागत आहे. क मध्ये दिपाली बारस्कर व विद्या दगडे यांच्यातील लढत चुरशी ठरणार आहे. त्या कोण बाजी मारणार हे आता येत्या दहा तारखेला स्पष्ट होईल. तसेच ब मध्ये शिवाजी चव्हाण यांच्या पत्नी मीना चव्हाण या राष्ट्रवादीकडून ढवण यांच्या विरोधात रिंगणात उभ्या आहेत. तर सागर बोरूडे यांची लढत अशोक कानडे यांच्याशी सरळ -सरळ होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
17 :thumbsup:
28 :heart:
32 :joy:
39 :heart_eyes:
16 :blush:
20 :cry:
18 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)