भाजप, राष्ट्रवादीच्या कुरेशी गटांच्या तलवारी भिडल्या

 नगरमध्ये सोमवारी मध्यरात्रीपर्यंत तणाव ; परस्परविरोधी तक्रारीवरून 55 जणांविरोधात गुन्हा

नगर: महापालिका निवडणूक पूर्ण होऊन दहा दिवस झाले आहेत, तरी तिचे कवित्व संपण्याचे चिन्हे नाहीत. निवडणुकीतील पराभव आणि विजय पचविणे उमेदवारांना अजूनही जड जात आहे. महापालिकेतील निवडणुकीच्या कारणावरून शहरातील नालबंद खुंट कुरेशी गट एकमेकांना भिडले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून असलेले हे दोन्ही कुरेशी गट नालबंद खुटं येथे समोरासमोर येत तलवारी, लोखंडी गज, हॉकी स्टीक, लाकडी दांडके, बॅट, गुप्तीने मारमाऱ्या करत एकमेंकावर जोरदार दगडफेक केली. या प्रकारामुळे सोमवारी रात्री दहा ते बारावाजेपर्यंत शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून 55 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावेद अहमदलाल कुरेशी आणि गयाझ शब्बीर कुरेशी यांनी या परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. नगसेवक मुज्जादीन कुरेशी याच्यासह 55 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वादाचे कारण हे राजकीय असल्याने शहर पोलिसांनी व्यापारी मोहल्लामधील पोलीस बंदोबस्त दुसऱ्यादिवशीही कायम ठेवला होता. मारामाऱ्यामध्ये तलवारींचा वापर झाल्याने दोन्ही बाजूकडून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जिल्हा रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींबरोबर जिल्हा रुग्णालयात हे दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आल्याने तिथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसीचे सहायक फौजदार गिनानदेव जावध यांनी स्वतंत्र फिर्याद दिली आहे. सरकारी कार्यालयात, विशेष करूतन जिल्हा रुग्णालयात एकत्र येत शिवीगाळ करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये कोठला येथील 57 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

जावेद अहमदलाल कुरेशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार नालबंद येथील व्यापारी मोहल्ला येथे चहा पीत बसलो होतो. त्यावेळी शहाबाज आब्रार कुरेशी, मुजेद्दीन मुश्‍ताक कुरेशी, तौसीफ मुश्‍ताक कुरेशी, आरीफ शब्बीर कुरेशी, गयाज शब्बीर कुरेशी, सैफ शब्बीर कुरेशी, अफजल आब्रार कुरेशी, बाबू अब्रार कुरेशी (सर्व रा. नालबंद खुंट, नगर) हे हातात तलावर, हॉकी स्टीक, गुप्ती घेत महापालिका निवडणुकीत पडल्याच्या कारणावरून गयाज कुरेशी याच्या डोक्‍यावर वार केला. तौसीफ याने गुप्ती, तर आरीफ याने लाकडी दांडके मारहाण केली.

समीर कुरेशी याला मुजाद्दीन कुरेशी याने डोक्‍यात गज, तर सौफ कुरेशी याने हॉकी स्टीक मारून जखमी केले. इतर सात ते आठ जणांनी लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. गयाझ शब्बीर कुरेशी याच्या फिर्यादीनुसार नगरसेवक मुज्जादीन ऊर्फ भा बाबुलाल कुरेशी, समीर बाबुलाल कुरेशी, अभीत बाबुलाल कुरेशी, वाहीत बाबुलाल कुरेशी, समत बाबुलाल कुरेशी, जावेद अहमदलाल कुरेशी, तौसीफ सादीक कुरेशी, इरफान हनीफ कुरेशी, इरफान हनीफ कुरेशी, अतीभ अरीभ कुरेशी, अरबाज अरीफ कुरेशी, अरबाज अरीफ कुरेशी, सादीक अहमदलाल कुरेशी, साकीद आरीफ कुरेशी, साहील वाहीद कुरेशी, तब्रीज अबीद कुरेशी (सर्व रा. व्यापारी मोहल्ला, नगर) यांच्यासह इतर 20 ते 25 जण हातात तलवार, लोखंडी गज, लाकडी दांडके, बॅट घेऊन घरात घुसले. जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. असीफ कुरेशी यास समीर कुरेशी त्याने डोक्‍यात मारहाण केली. मुज्जादीन कुरेशी याने सैफ कुरेशी याच्या डोक्‍यावर तलवार मारली. सैफ याला वाचविण्यासाठी फिर्यादी गयाझ आणि इरफान कुरेशी याच्यावर गजाने वार केले. आरीफ याला तौसीफ कुरेशी व जावेद कुरेशी याने लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. घरातील कुटुंबियांना, महिलांना लाकडी दांडके आणि वीटाने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.


जिल्हा रुग्णालयात 57 जणांकडून राडा

नालबंद खुंट येथे कुरेशी गटात झालेल्या राजकीय वादाचे पडसाद जिल्हा रुग्णालयात उमटले. नालबंद खुंट येथे तलवारीने झालेल्या मारामारीतील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमीं दोन्ही बाजूकडील होते. जिल्हा रुग्णालयात दोन्ही बाजूकडील कुरेशी गट पुन्हा एकदा समारोसमोर आले. तिथे पुन्हा दोन्ही गट भिडले. तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी 57 जणांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार गिनानदेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. समीर बाबुलाल कुरेशी, बिस्मिल्ला शेख कुरेशी व त्यांच्या 22 साथीदार, तर जावेद अहमदलाल कुरेशी, गायब शब्बीर कुरेशी, गयाज शब्बीर कुरेशी व त्यांचे 22 साथीदार (सर्व रा. नालबंद खुंट), आतिक अब्रार कुरेशी, अफसर मोहमंद कुरेशी, अफजल अब्रार कुरेशी, लतीफ अब्दुल अन्सारी, बिस्मिल्ला शेख कुरेशी व शहाद कुरेशी (सर्व रा. कोठला) यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)