जम्मू – कठुआत एका अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणानंतर तेथील स्थिती भाजपच्या दोन मंत्र्यांमुळे चिघळली आहे असा आरोप होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर या दोन मंत्र्यांवरील आरोपांबाबत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी खुलासा करावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. राज्याचे विद्यमान वनमंत्री लालसिंग आणि उद्योग पंत्री चंद्रप्रकाश गंगा हे या प्रकरणात रसाना येथे जे आंदोलन झाले होते तेथे गेले होते. त्यांनी या प्रकरणात जमावाला भडकावण्याचे काम करून तेथील स्थिती चिघळवली असा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष जी ए मीर यांचा आरोप आहे.

या प्रकरणाला धार्मिक स्वरूप देण्याचे काम करणाऱ्या या दोन मंत्र्यांची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तथापि मुख्यमंत्री या दोन मंत्र्यांना पाठिशीच घालण्याचे काम करीत असून त्यांच्या निष्क्रीयते मागे नेमके काय कारण आहे हे समजले पाहिजे अशी मागणीही कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)