भाजप बाबतची भूमिका स्पष्ट करा; राहुल गांधी यांची देवेगोैडा यांना जाहीर सूचना

के आर पेटे, (कर्नाटक) – जनता दल सेक्‍युलर पक्षाने भाजप बाबतची आपली भूमिका काय आहे हे त्यांनी जनतेला स्पष्ट करून सांगावे अशी सुचना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या पक्षाचे प्रमुख माजी पंतप्रधान एच. डी. देवेगोैडा यांना केली आहे. जनता दल सेक्‍युलर हा पक्ष भाजपची बी टीम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे हे खरे आहे की नाही हे त्यांनीच स्पष्ट केले पाहिजे अशी जाहीर सूचना राहुल गांधी यांनी केली आहे. ते आज येथे वोक्कलिंगांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात जाहीर सभेत बोलत होते. हा भाग जनता दल सेक्‍युलरच्या प्रभावाखालील भाग म्हणून ओळखला जातो.

कर्नाटकात त्रिशंकु स्थिती निर्माण झाली की त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी जनता दल सेक्‍युलर हा पक्ष टपून बसला असल्याची वदंता असून हा पक्ष सत्तेसाठी भाजपशीही साटेलोटे करू शकतो असे सांगितले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देवेगौडा यांना या बाबत भूमिका स्पष्ट करण्याचे जाहीर आव्हान देऊन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जनता दल सेक्‍युलर हा पक्ष जनता दल संघ परिवार म्हणून ओळखला जाणार आहे काय असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांचा कर्नाटकातील हा चौथ्या टप्प्याचा प्रचार असून सध्या ते म्हैसुर भागातील प्रचारात व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर पुन्हा जोरदार हल्ला चढवला. रोजगार निर्मीतीचा अभाव ही या सरकारची मोठी समस्या आहे असे नमूद करून ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यातही या सरकारला अपयश आले आहे. नीरव मोदी 22 हजार रूपये घेऊन विदेशात रवाना झाला, देशाचा चौकीदार काय करीत आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. सिद्धरामैय्या यांनी कर्नाटकात स्वच्छ सरकार चालवल्याचा दावाही त्यांनी केला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)