भाजप पाठिंब्यास मी जबाबदार : आ.जगताप

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा यापैकी कोणाचाही कोणताही आदेश नाही । शहर विकासासाठी भाजपला पाठिंबा

नगर: महापालिका निवडणुकीत भाजपने कोटीच्या कोटी रुपये आणू असे आश्‍वासन दिले होते.निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर होण्याची शक्‍यता धुसर झाली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाच्या मुद्‌द्‌यावर पक्षातील नगरसेवकांची एकत्रित बैठक घेवून त्यात भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय एवढा ऐनवेळी घेण्यात आला की पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत कल्पना देता आली नाही. त्यामुळे या निर्णयाला पक्षातील वरिष्ठांचा कोणताही संबंध नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाला मीच जबाबदार असल्याची थेट कबुली आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आ. जगताप म्हणाले, शहर विकास महत्वाचा आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामाध्यमातून मोठा निधी शहर विकासला मिळू शकतो. त्यानुसार शहर विकासासाठी 300 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांना मतदान केले असले तरी राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा राहणार आहे. पक्ष एकही सत्तेचे पद घेणार नाही. असे सांगून आ. जगताप म्हणाले, शिवसेनेने मागील अडीच वर्षांत शहराची केवळ बदनामी केली. एकही विकासाचे ठोस काम केले नाही. आहे ती कामे देखील बंद पाडली. शहर बससेवा बंद केली, खत प्रकल्प बंद झाला. महावितरणची पाणीबिलाची थकबाकी न भरल्याने वारंवार शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुन्हा शिवसेनेचा महापौर झाला तर पुन्हा शहरचा विकास खुंटणार हे नक्‍की होते. त्यापेक्षा भाजपचा महापौर झाला तर मोठा निधी उपलब्ध होवून विकास कामे मार्गी लागतील. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांसह मी भाजपला पाठिंबा देवून त्यांचा महापौर करण्याचा निर्णय घेतला.

भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्याबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय, प्रदेश व जिल्हा यापैकी कोणीही कोणताही आदेश दिला नव्हता. पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष खुलासा विचारणार, त्याला मी उत्तर देणार आहे. खुलास करण्याची माझी जबाबदारी आहे. निर्णयच माझा आहे. त्यामुळे त्यात अन्य कोणाला जबाबदार धरण्याचा प्रश्‍न येत नाही. पक्ष जी कारवाई करेल त्याला मी समोरे जाईल. भाजपला पाठिंबा दिला असून सत्तेतील एकही पद राष्ट्रवादी घेणार नाही. परंतू भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादीचे नगरसेवक अंकूश ठेवणार आहेत. चुकीच्या पद्धतीने कामे होत असतील तर ती चव्हाट्यावर आणण्यात येतील, असे आ. जगताप म्हणाले.

यावेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, शीतल जगताप, शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते,

कॉंग्रेसच्या त्या नेत्यालाही मान्य होते

कॉंग्रेस महापालिका निवडणूक ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढली.त्या नेत्याला देखील भाजपला पाठिंबा देण्याचे मान्य होते. परंतू नगरसेवकांना ते मान्य नसल्याने त्यांनी बहिष्कार टाकला. भाजपबरोबर चर्चा करतांना कॉंग्रेसचे ते नेतृत्व देखील सहभागी झाले असल्याचा गौप्यस्फोट आ. जगताप यांनी केला आहे. यामुळे आता कॉंग्रेसचे डॉ.सुजय विखे यांची अडचण आणखी वाढली आहे.

फाळके चुकीचे बोलतात

भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी झाला आहे. त्यामुळे याबाबत पक्षाच्या कोणत्याही नेत्यांशी चर्चा झाली नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे महापालिका निवडणुकीत देखील आले नाही किंवा त्यांची याबाबत संपर्क केला नाही. या सर्व घटनेची जबाबदारी मी घेतल्याने फाळके काय बोलतात. त्याला महत्व नाही. परंतू ते जे बोलले ते चुकीचे असल्याचा दावा आ. जगताप यांनी केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)