भाजप पाठिंब्याचा निर्णय स्थानिकपातळीवरचा- अकुंशराव काकडे

नगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे काही निर्णय घ्यावयाचे आहे. त्याचे अधिकार हे स्थानिक पातळी वर यापूर्वी देण्यात आले आहे. स्थानिक राजकारण त्यांना करायचे असते. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. महापालिकेत भाजपचा महापौर होण्यासाठी जर राष्ट्रवादी पाठिंबा देत असेल तर तो स्थानिकपातळवरचा निर्णय आहे, तसा त्यांना अधिकार असल्याने तो निर्णय घेतला आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष निरिक्षक अकुंशराव काकडे यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलतांना व्यक्‍त केले.

महापालिका निवडणुकीत एकही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून आता महापौरपदासाठी आवश्‍यक असलेला बहुमताचा जादूई 35 आकडा गाठण्यासाठी सर्वच राजकीय आपल्यापरीने प्रयत्नशिल आहेत. सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या शिवसेनेचे महापौरपदासाठी दावा केला आहे. अर्थात नगरकरांनी दिलेला कौल पाहता शिवसेना व भाजप युतीशिवाय पर्याय नाही. परंतू आता भाजपला राष्ट्रवादीने महापौरपदासाठी पाठिंबा जाहिर केला आहे. विशेष म्हणजे कोणतीही पदे न घेता हा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रवादीचे पक्षनिरिक्षक काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानिकपातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले आहे. नगरचे राजकारण आमदार अरूण जगताप, आमदार संग्राम जगताप, दादा कळमकर यांना करायचे आहे. पुढील लोकसभा व विधानसभा निवडणूक देखील त्यांना लढवायाची आहे. त्यामुळे त्यांच्या व पक्षाच्या दृष्टीने हे राजकारण करतील. याबाबत मध्यतंरी आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यांच्या दृष्टीने स्थानिक राजकारण महत्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाने भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे भाजपविरोधी मोहिम राबवून समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असतांना नगरमध्ये राष्ट्रवादी थेट भाजपला पाठिंबा देत आहे. यावर काकडे म्हणाले की, स्थानिक राजकारणात अशा गोष्टी होतात. त्याचा वरच्या राजकारणावर परिणाम होत नाही. हा पाठिंबा दिला म्हणून वरती अन्य पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर येणार नाही, असे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने हे राजकारण करण्यात येते.

मध्यंतरी पक्षाच्या नेत्यांना खूप त्रास झाला

मध्यतंरी राष्ट्रवादीच्या नेत्यांना खूप त्रास झाला. जे योग्य नसतांनाही ते झाले. त्यामुळे महापालिकेत पक्षाची सत्ता येणे आवश्‍यक होते. परंतू ते झाले नाही. आता भाजपला पाठिंबा देवून सत्तेत नसलो तरी विकास कामे करता येईल. म्हणून हा पाठिंबा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)