भाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार

खेड: लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप विरोधात परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, कोकणातील खेड याठिकाणी बोलताना अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली. भाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते. शिवसेना राम मंदिर बनवण्याच्या कामात लागते. यांचा आणि प्रभु रामचंद्राच्या मंदिराचा काय संबंध? निवडणूक आली की हे रामामंदिराचा वाद बाहेर काढतात. अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, सीबीआय मध्ये सुरु असलेल्या वादंगावर अजित पवार यांनी टीका केली. “सीबीआयच्या आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्यांना रूजू होण्याचे आदेश दिले. मात्र सरकारने पुन्हा त्यांना सीबीआयमधून हटवलं. अशी हुकूमशाही देशात या आधी कधीच घडली नव्हती. असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेतील खेड येथील सभेस संबोधित करताना विधिमंडळ पक्षनेते आ. Ajit Pawar#परिवर्तनयात्रा

Posted by Nationalist Congress Party – NCP on Thursday, 10 January 2019


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)