“भाजप नगरसेवक 14 रत्नांप्रमाणे’

नगर: महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रथमच स्वबळावर लढली. नऊ नगरसेवक असलेले भाजपचे आता 14 नगरसेवक निवडून आले आहेत. मोठे यश मिळाले नसले, तरी जनतेने दिलेला कौल मान्य आहे. शहर विकासाकरीता भाजप कटिबद्ध आहे. पराभव झाला असला, तरी घेतलेला विकासाचा वसा पूर्ण करू. भाजपचे हे 14 नगरसेवक 14 रत्नांप्रमाणे काम करतील, असा विश्‍वास शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केला.

शहर भारतीय जनता पक्षातर्फे महापालिकेच्या नवनिर्वाचित 14 नगरसेवकांचा भाजप कार्यालयात खासदार दिलीप गांधी यांनी सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे “विकास के पथ पर’ हे पुस्तक यावेळी वाटप करण्यात आले. शहरात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 10 कोटींचे विकासकामे महिना अखेरीस सुरू करू, अशीही माहिती गांधी यांनी दिली. गौतम दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, चेतन जग्गी, वसंत राठोड, विश्‍वनाथ पोंदे, मयुर ताठे, किशोर वाकळे, नितीन शेलार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
56 :heart:
36 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)