भाजप नगरसेवकांची सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी

पिंपरी – भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे आणि नगरसेविका कमल घोलप यांनी प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देत देण्यात आली. नगरसेवक प्रा. केंदळे म्हणाले की, दिवाळी सणाचा खरा आनंद गोरगरीबांना मदतीमध्ये आहे. सफाई कर्मचारी दररोज आपल्या घरातील कचरा उचलतात. प्रभाग आणि शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने काम करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करुन त्यांचा सन्मान शहरवासियांना राखला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सन्मानामुळे सफाई कर्मचारी भारावून गेले होते. एक नगरसेवक म्हणून हा उपक्रम राबविण्यासाठी प्रा. केंदळे यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी भाजप नेते बापू घोलप, सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील, गोरख कोलते, उमेश घोडेकर, प्रभु बालचंद्रन, कौस्तुभ देशपांडे, विशाल केंदळे, गणेश साठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)