भाजप खासदाराच्या मुलाला भोवली बिहारमधील दारूबंदी!

मित्रासमवेत तर्र झाल्याने तुरूंगात रवानगी
पाटणा – सत्तारूढ भाजपचे खासदार हरी मांझी यांच्या मुलाला बिहारमधील दारूबंदी चांगलीच भोवली. मित्रासमवेत मद्यप्राशन करून तर्र झाल्याने मांझी यांच्या मुलाची रवानगी थेट तुरूंगात झाली.

बिहारमध्ये 5 एप्रिल 2016 पासून पूर्ण दारूबंदी लागू करण्यात आली आहे. दारूबंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी कठोर कायदा करण्यात आला आहे. यापार्श्‍वभूमीवर, खासदार मांझी यांचा मुलगा राहुलकुमार आणि त्याच्या मित्राला दारू प्यायल्याबद्दल रविवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना आज गयामधील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी तुरूंगात झाली. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप युतीचे सरकार आहे.

-Ads-

त्यामुळे खासदारपुत्राच्या अटकेची घटना सरकारची गोची करणारी ठरली आहे. दरम्यान, खासदार मांझी यांनी त्यांच्या मुलावरील आरोप फेटाळला आहे. संबंधित परिसरात दारूचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मी पोलिसांना दिली होती. त्यावरून कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी माझ्या मुलालाच गोवले, असे त्यांनी म्हटले आहे. तर दलितांना लक्ष्य करण्यासाठी दारूबंदी कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)